जेएनएन, मुंबई. मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रात 21 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 10 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती सरकार कडून देण्यात आली आहे.
21 जणांचा मृत्यू
15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक आपत्ती आणि दुर्घटनेमुळे जीवितहानी व वित्तहानी झाली आहे. या काळात एकूण 21 जणांचा आणि 12 प्राण्यांचा मृत्यू झाला आहे, तर 10 जण जखमी झाले आहेत.
नांदेडमध्ये 7 जणांचा मृत्यू
नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक जीवितहानी झाली असून, पुराच्या पाण्यात वाहून जाणे, वीज पडून आणि भिंत कोसळून अनेक घटना घडल्या. यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आहे. याचप्रकारे, मुंबई शहर आणि उपनगर येथे घर आणि भिंत कोसळण्याच्या घटनांमध्ये जीवितहानी झाली. वाशिम, यवतमाळ आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये पुराच्या पाण्यामुळे काही जणांचा आणि प्राण्यांचा मृत्यू झाला आहे.
वीज पडून मृत्यू होण्याच्या घटना बुलढाणा, अमरावती, भंडारा आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये नोंदवल्या गेल्या आहेत. रायगड जिल्ह्यात दरड कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाण्यात बुडून एकाचा मृत्यू झाला. नागपूर, बीड आणि चंद्रपूर येथे पुरात वाहून जाण्याच्या घटना घडल्या. अकोला जिल्ह्यात भिंत कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
या शासनाने जाहीर केलेल्या अहवालात एकूण 21 मनुष्य आणि 12 प्राण्यांचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे, तर 10 मनुष्य जखमी झाले आहेत.
कुठे किती जणांचा झाला मृत्यू